Ad will apear here
Next
पर्यटकांसाठी रायगडावरील ‘ई-बुक’
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले प्रकाशन

मुंबई : रायगड जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची माहिती एकत्रितरीत्या उपलब्ध व्हावी, यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘रायगड : पर्यटन विविधा’, या ‘ई-बुक’चे नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. रायगड जिल्ह्यात येणाऱ्या सर्व पर्यटकांना माहिती देणाऱ्या ‘मोबाईल ॲप’चेही या वेळी उद्घाटन करण्यात आले.

रायगड जिल्हा हा पर्यटनाच्या दृष्टीने समृद्ध असा जिल्हा आहे. याठिकाणच्या पर्यटन स्थळांची संपूर्ण माहिती पर्यटकांना सोप्या पद्धतीने एकत्रितपणे उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून, जिल्हा माहिती कार्यालय, रायगड यांच्यामार्फत हे ‘ई-बुक’ आणि ‘मोबाईल अॅप’ तयार करण्यात आले आहे. 

मंत्रालयातील मुख्यमंत्री सचिवालयात असलेल्या समिती सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रिमोट कंट्रोलद्वारे या ई-बुकचे प्रकाशन करण्यात आले. हे ई-बुक www.raigadtourism.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच इतर काही मराठी 'ई-बुक्स'च्या संकेतस्थळांवरही ते उपलब्ध असेल. याबरोबरच विकसित करण्यात आलेल्या ‘मोबाईल ॲप’मध्ये पर्यटनस्थळे, निवास, भोजन सुविधा, मार्ग, नकाशे, वाहन सुविधा आदींबाबत माहिती व सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांचे पर्यटन सुकर होण्यास मदत होणार आहे. या पुस्तकात रायगड जिल्ह्यातील लेणी, गड-किल्ले, ऐतिहासिक पर्यटनस्थळे, धार्मिक स्थळे, समुद्र किनारे, साहसी पर्यटन, धबधबे आदी समग्र पर्यटन स्थळांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. जगभरातील मराठी वाचकांना रायगड जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची माहिती पोहोचविणाऱ्या या उपक्रमाचे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी कौतुक केले आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/LZUABW
Similar Posts
१०१ रुपयांच्या त्या ‘अनमोल’ भेटीने मुख्यमंत्री भारावले! मुंबई : राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छांचा वर्षाव होणे, ही दर वर्षीचीच गोष्ट; पण यंदाच्या वाढदिवशी मुख्यमंत्री सहायता निधीला मिळालेल्या विशेष भेटीमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भारावून गेले आहेत. ती भेट फक्त १०१ रुपयांची आहे; मात्र तिचे मूल्य अनमोल आहे.
मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीसच; अजित पवार उपमुख्यमंत्री मुंबई : कित्येक दिवस चाललेल्या चर्चांच्या फैरींनंतर एका रात्रीत महाराष्ट्राच्या राजकारणाने अचानक दिशा बदलली आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. उपमुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शपथ घेतली आहे. आज सकाळी (२३ नोव्हेंबर) या दोन्ही नेत्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली
देवेंद्र फडणवीस यांच्यावरील पुस्तकाचे २४ एप्रिलला प्रकाशन मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आधारित ‘मॅन ऑन मिशन महाराष्ट्र’ या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी, २४ एप्रिल रोजी केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे दुपारी साडेतीन वाजता पार पडणाऱ्या या प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी
‘सीएम’च्या वाढदिवशी महामृत्युंजय जप नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरची सर्व प्रकारची विघ्ने टळावीत, यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने २१ जुलैला महामृत्युंजय जप व पूर्णाहुती यज्ञ करण्यात येणार आहे. पक्षाच्या वतीने प्रभागातील दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. याखेरीज विविध आघाड्यांच्या वतीने

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language